क्रीडा स्पर्धांत सर्वोदय विदयालयाचा आणखी एक मानाचा तुरा
Akole News: सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय खिरविरे येथील खेळाडूंनी जिल्हास्तरावर नेत्रदिपक यश मिळवत विभागीय स्पर्धांसाठी निवड.
पिंपळगाव नाकविंदा/सचिन लगड: क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय मैदानी स्पर्धा क्रीडा संकुल वाडिया पार्क अहमदनगर येथे निकोप वातावरणात संपन्न झाल्या.
या स्पर्धांत अकोले तालुक्यातील सत्यनिकेतन संस्थेतील सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय खिरविरे येथील खेळाडूंनी जिल्हास्तरावर नेत्रदिपक यश मिळवत विभागीय स्पर्धांसाठी निवड झाली झाली.
यामध्ये कु.अनामिका प्रविण पराड हिने गोळाफेक मध्ये द्वितीय क्रमांक,कु.कांचन नामदेव डगळे हिने तिहेरी उडी मध्ये द्वितीय क्रमांक मिळविला आहेत.तर कु.सोनाली प्रकाश साबळे हिने १५०० मीटर धावणे स्पर्धात तृतीय क्रमांक मिळविला आहे. कु.अनामिका पराड तसेच कु.कांचन डगळे यांची विभागीय स्पर्धांसाठी निवड झाली आहे.त्यामुळे शालेय क्रीडा स्पर्धांत सर्वोदय विदया मंदिर खिरविरे विदयालयाच्या इतिहासात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. अशी माहीती विदयालयाचे प्राचार्य मधुकर मोखरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक प्रा.विक्रम आंबरे, प्रा.रामदास डगळे, भरत भदाणे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. या नेत्रदिपक कामगिरीबद्दल गुणवंत खेळाडू तसेच मार्गदर्शक क्रीडा शिक्षक यांचे सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष अॅड.मनोहरराव देशमुख, सचिव टि.एन.कानवडे, कोषाध्यक्ष विवेकजी मदन, संचालक मिलिंदशेठ उमराणी, मारूती मुठे, अशोक मिस्त्री, प्रकाश टाकळकर, विजय पवार, प्रकाश महाले, विलास पाबळकर, सर्व संचालक मंडळ, दिनेश शहा, पोलिस पाटील हिरामण बेणके, प्राचार्य मधुकर मोखरे, लिपिक भास्कर सदगिर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच खिरविरे ग्रामपंचायतीचे सरपंच गणपतराव डगळे, उपसरपंच सुभाषशेठ बेणके, सर्व सदस्य, आदिवासी विकास कार्यकारी संस्थंचे चेअरमन,व्हा .चेअरमन, सर्व संचालक, समस्थ ग्रामस्थ आदिंनी अभिनंदन केले तसेच भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Web Title: Another honorable tour of Sarvodaya Vidyalaya in sports competitions
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App