Home अहिल्यानगर नगर जिल्ह्यात या तालुक्यात आणखी एका मुलीचे अपहरण, आठवड्यात पाच मुलींचे अपहरण

नगर जिल्ह्यात या तालुक्यात आणखी एका मुलीचे अपहरण, आठवड्यात पाच मुलींचे अपहरण

Another girl was abduction this taluka in Nagar

Ahmednagar Crime | राहुरी| Rahuri: राहुरी तालुक्यातील आणखी एका अल्पवयीन मुलीचे (Abduction of Minor Girls) अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द परिसरात तिच्या आईवडिलांसोबत राहते. दि. 28 मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजे दरम्यान ती अल्पवयीन मुलगी पेपरला जाते, असे सांगून घरातून बाहेर गेली होती. ती सायंकाळी उशिरापर्यंत घरी परत आली नाही. तिच्या नातेवाईकांनी तिचा खूप शोध घेतला. मात्र, ती मिळून आली नाही. आपल्या मुलीचे कोणीतरी अज्ञात कारणासाठी अपहरण केल्याची खात्री झाल्यानंतर अखेर त्यांनी राहुरी पोलिसांत धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला.

त्या अल्पवयीन मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून पोलिसांत अज्ञात इसमाविरोधात त्याच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास हवालदार एकनाथ आव्हाड हे करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

 दरम्यान राहुरी तालुक्यातून काही दिवसांपासून अल्पवयीन मुलींचे अपहरण होण्याच्या घटनेत वाढ झाल्याने पोलिसांच्या निष्क्रियतेवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. मागील आठवड्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण होण्याची ही पाचवी घटना आहे. मागील अपहरण झालेल्या घटनांचा तपास लावण्यात राहुरी पोलीस अपयशी) ठरल्याने नागरिकांनी राहुरीत आता खमक्या पोलीस अधिकार्‍याची नेमणूक करण्याची मागणी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे केली आहे.

Web Title: Another girl was abduction this taluka in Nagar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here