ठाकरेंना आणखी एक धक्का: एक आमदार शिंदे गटात सामील
मुंबई: हिंगोली मतदार संघाचे आमदार संतोष बांगर हे उद्धव ठाकरे समर्थक आहेत. परंतु अपात्रतेच्या कारवाईच्या भीतीने आमदार बांगर हे शिंदे गटात सामील झाले की काय? याबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे. बांगर यांच्या जाण्याने उद्धव ठाकरे यांना पुन्हा एक धक्का बसला आहे. आता ठाकरे समर्थक शिवसेना आमदारांची संख्या १५ राहिली आहे. तर शिंदे गटात आमदारांची संख्या ४० वर पोहोचली आहे.
शिवसेनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 39 आमदारांनी वेगळी भूमिका घेतल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळून शिंदे – फडणवीस सरकार अस्तित्वात आले. एकनाथ शिंदे यांच्यासह जवळपास 39 आमदार या गटात होते. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत 16 आमदार होते. उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असल्याचा दावा करणाऱ्या आणखी एका आमदाराने शिंदे गटाचा हात धरला आहे. हे आमदार उद्धव ठाकरेंना आपण एकनिष्ठ असल्याचे सांगत भावूक झालेले दिसून आले होते. परंतू आज हे देखील शिंदे गटात दाखल झाल्याने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानले जात आहे.
Web Title: Another blow to Thackeray One MLA joins Shinde group