पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून राग अनावर, पत्नीच्या डोक्यात फर्शी घालून हत्या
Pune Murder Case: चारित्र्याच्या संशयावरून वारंवार भांडण करत त्याच्या पत्नीला मारहाण करत होता.
पिंपरी चिंचवड: पत्नीच्या चारित्र्याच्या संशायावरून राग अनावर झालेल्या पतीने पत्नीच्या डोक्यात कडप्पा फरशी घालून खून केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमधून समोर आली आहे. सोमवारी रात्री वाकडमधील काळाखडक परिसरात घडली.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपी रमेश हनुमंत पुजारी (35, रा. रामसुपर मार्केट, काळाखडक, वाकड) याला पोलीसांनी अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुलीसमोर पतीने पत्नीची हत्या केली आहे.
अधिक माहितीनुसार, आरोपी रमेश पुजारी आणि त्याची पत्नी ललिता रमेश पुजारी वाकड मधील काळाखडक परिसरात वास्तव्यास होते. पती रमेश आणि त्याची पत्नी ललीता यांच्यात अनेकदा वाद होत होते. चारित्र्याच्या संशयावरून रमेश वारंवार भांडण करत त्याच्या पत्नीला मारहाण देखील करत होता. सोमवारी रात्री पुन्हा त्यांच्यात भांडण झाले. यावेळी रागाच्याभरात रमेशने पत्नीच्या डोक्यात कड्डप्पा फरशी मारून तिचा खून केला. त्यानंतर आपल्या हातून खून झाल्याचे लक्षात येताच रमेशने तेथून पळ काढला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर काही वेळातच आरोपी रमेश पुजारी याला पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.
Web Title: anger over the suspicion of his wife’s character, he murder his wife