Breaking News | Nashik Crime: जुन्या भांडणातून झालेल्या वाद विकोपाला गेल्याने सुरीने वार करून तरुणाचा खून.
पेठः तालुक्यातील कोपुर्ली खुर्द येथे जुन्या भांडणातून झालेल्या वाद विकोपाला गेल्याने सुरीने वार करून तरुणाचा खून करण्यात आला. भारत धनराज गवळी (वय २८) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी संशयित मधुकर गंगाराम भुसारे व मंगलाबाई मधुकर भुसारे (दोघेही रा. कोपुर्ली खु.) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
पेठ तालुक्यातील कापूर्ण येथील येथील रहिवाशी भारत गवळी हा त्याची सासुरवाडी असलेल्या कोपुर्ली खुर्द येथे राहत होता. गुरुवारी (दि. ११) रोजी कोपुलर्जी खुर्द येथील मारुती मंदिराजवळ भारत
गवळी व मधुकर भुसारे यांच्यात शाब्दिक वादावादी झाली, यावेळी मधुकरची पत्नी मंगलाबाई हिने भारतला पाठीमागून धरून ठेवले तर मधुकर भुसारे याने त्याच्या हातात असलेल्या सुरीने भारत याच्या खांद्यावर व मानेजवळ वार केले. यात भारतचा मृत्यू झाला. याप्रकरणी पंडित नामदेव तलवारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयितांविरुद्ध पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडक यांनी घटनास्थळी भेट दिली. पेठ पोलिसांनी संशयितांना शिताफीने जेरबंद केले. याबाबत पोलीस निरीक्षक वसंत पथवे पोलीस उपनिरीक्षक कैलास दरगुडे, हवालदार रवींद्र तांदळे, मनोज गायकवाड, जाधव, शेख आदी अधिक तपास करीत आहेत.
Web Title: An old dispute stung the youth
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study