अहमदनगर: शेतात काम करणाऱ्या महिलेला उसात ओढत नेऊन अत्याचार
Breaking News | Ahmednagar: द्राक्षाच्या बागेमध्ये गवत खुरपणाऱ्या मजूर महिलेला बळजबरीने उसात ओढत नेवून तिच्यावर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना.
श्रीरामपूरः राहाता तालुक्यातील एका गावात द्राक्षाच्या बागेमध्ये गवत खुरपणाऱ्या मजूर महिलेला बळजबरीने उसात ओढत नेवून तिच्यावर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली.
राहाता तालुक्यातील एका गावात ३५ वर्षीय मजूर महिला आपला पती, तीन मुलं यांच्यासह राहते. ८ जुलैला सकाळी संबंधित महिला ही येणगे याच्या द्राक्ष बागेत गवत खुरपत होती. तिचे पती हे शेजारच्या द्राक्ष बागेत काम करत होते.
दुपारी १२ च्या सुमारास महिला एकटीच द्राक्ष बागेत गवत खुरपायचे काम करत असताना शेताचा मालक किशोर येणगे हा तेथे आला. आजूबाजूला कोणी नसल्याचा फायदा घेत येणगे याने या महिलेचा हाथ पकडला व द्राक्ष बागेच्या बाजूला असलेल्या उसाच्या शेतात जबरदस्तीने तिला ओढत नेत अत्याचार केला.
तिने हा प्रकार आपला भाऊ, भावजई तसेच आई, वडील यांना फोन करून सांगितला. नातेवाईकांसोबत येवून सदर महिलेने श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी किशोर कारभारी येणगे याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेने खळबळ उडाली आहे.
Web Title: woman working in the field was abused by being dragged into sugarcane
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study