धक्कादायक! ८ वर्षीय मुलावर तीन नाराधमांचा दोन महिन्यांपासून अनैसर्गिक अत्याचार
Pune Crime: पुण्यात एक धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. घराशेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलावर तिघांनी अनैसर्गिक अत्याचार (Unnatural abused) केल्याची घटना उघडकीस आली आहे.
पुणे : पुण्यात एका ८ वर्षीय अल्पवयीन मुलावर त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या तिघांनी त्याला अश्लील व्हिडिओ दाखवून अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी त्याला हा प्रकार त्याच्या घरी सांगण्याची धमकी देऊन त्याच्यावर तब्बल गेल्या दोन महिन्यांपासून अत्याचार करत होते. या प्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्याचार करणाऱ्या तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे.
संतोष उर्फ पक्या प्रकाश शिंदे (वय २१), हेमंत उर्फ हेम्या महेश माळवे (वय १९) आणि किरण सुरेश सावंत (वय २५) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या तिघांवर बाललैंगिक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकरणी पीडित मुलाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या घटनेची हकिगत अशी की, आरोपी आणि फिर्यादी घराजवळ राहतात. फिर्यादीच्या ८ वर्षीय मुलाला आरोपी संतोष उर्फ पक्याने विमल आणण्यासाठी दुकानात पाठवले होते. यानंतर त्याला त्याच्या पर्वती दर्शन येथील घरी नेत, त्याच्या घरी असलेला दूसरा आरोपी हेमंत उर्फ हेम्या याने या मुलाला अश्लील व्हिडिओ दाखवला. यानंतर संतोष उर्फ पक्याने त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. आरोपी किरण सावंतने या घटनेचा व्हिडिओ तयार केला.
यानंतर हा व्हिडिओ त्याच्या घरच्यांना दाखवण्याची धमकी देत गेल्या दोन महिन्यांपासून त्याच्यावर अत्याचार करण्यात येत होते. एवढेच नाही तर या बाबत कोणाला सांगितल्यास चाकू खुपसून तुला मारून टाकीन. त्यानंतर पेटीमध्ये टाकून लॉक करून एका खड्ड्यात टाकीन. तुझ्या आई-वडिलांनी विचारले कुठे गेला तर आम्हाला माहित नाही असे सांगेन अशी धमकी देखील आरोपींनी मुलाला दिली. अखेर मुलाने हा प्रकार घरच्यांना सांगितल्यावर या प्रकरणाचा उलगडा झाला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा (Crime) दाखल करत तिघांना अटक केली आहे.
Web Title: An 8-year-old boy was brutally abused by three gang members for two months
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App