Home अकोले आ. अमोल खताळ यांनी अधिकाऱ्यांना दिली तंभी, आता ती सवय बदलावी लागेल

आ. अमोल खताळ यांनी अधिकाऱ्यांना दिली तंभी, आता ती सवय बदलावी लागेल

Sangamner News: मतदारसंघातील सर्वसामान्य लोकांचे कुठलेच काम अडले जाणार नाही याची प्रत्येक अधिकाऱ्याने व कर्मचाऱ्याने दक्षता घ्यावी, पंचायत समितीचा आमदार अमोल खताळांनी घेतला आढावा. (Amol Khatal).

Amol Khatal gave tambi to the authorities

संगमनेर:  मी कोणत्याही क्षणी कुठल्याही विभागात किंवा कुठल्याही अंगणवाडीत, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय केंद्र कुठल्याही ठिकाणी कधीही येऊ शकतो. जर त्याठिकाणी अधिकारी व कर्मचारी जागेवर सापडले नाही तर त्यांची गय केली जाणार नाही, अशी तंबीच संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी पंचायत समितीच्या सर्व विभागप्रमुखांना दिली.

संगमनेरच्या आमदारपदी निवड झाल्यानंतर प्रथमच आमदार अमोल खताळ यांनी पंचायत समितीला भेट देत अधिकाऱ्यांशी विकासकामांच्या संदर्भात चर्चा केली. यावेळी गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्यासमवेत माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे जनसंपर्क अधिकारी प्रमोद रहाणे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रामभाऊ रहाणे यांच्यासह पंचायत समितीच्या विविध खात्यांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

आमदार खताळ यांनी पंचायत समितीच्या विभागानुसार प्रत्येक खात्यातील घरकुलाची किती कामे पूर्ण झाली, रस्त्यांची कामे कुठे बाकी आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्राची कामे कशी सुरू आहेत, अंगणवाडीच्या इमारती किती तयार आहेत आणि किती तयार करायच्या आहेत असे एकामागे एक प्रश्न विचारले. मात्र तेवढ्याच समर्पकपणे अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. गटविकास अधिकारी नागणे यांनी सर्व विभागांचा धावता आढावा त्यांना दिला.

मी पंचायत समितीत व तालुक्यातील कुठल्याही शासकीय कार्यालयात कधीही जाऊ शकतो. जर मला कार्यालयामध्ये अधिकारी अगर कर्मचारी सापडले नाही तर त्यांची अजिबात गय केली जाणार नाही. मला कामात हलगर्जीपणा नको आहे. पंचायत समितीत येणाऱ्या प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीचे काम झाले पाहिजे, अशा सक्त सूचना आमदार खताळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

आता ती सवय बदलावी लागणार…

येथून मागे तुम्हाला यशोधन कार्यालयातून आलेल्या लोकांची कामे करण्याची सवय होती. आता ती सवय तुम्हाला बदल- ावी लागणार आहे. यापुढील काळात यशोधन वगैरे काही चालणार नाही. आमदार कार्यालयाकडून आलेल्या सूचनेन- सार सर्वसामान्य जनतेची कामे तुम्हाला करायची आहे. मतदारसंघातील सर्वसामान्य लोकांचे कुठलेच काम अडले जाणार नाही याची प्रत्येक अधिकाऱ्याने व कर्मचाऱ्याने दक्षता घ्यावी. अमोल खताळ, आमदार-संगमनेर.

Web Title: Amol Khatal gave tambi to the authorities

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here