अकोले: अनोळखी मृतदेहाची ओळख पटली, संपतीवरून खून
अकोले | Murder Case: अकोले तालुक्यातील वाकी येथे २८ डिसेंबर रोजी एक मृतदेह आढळून आला होता. या खुनाचा तपास करीत असताना दुसऱ्या एका खुनाचाही तपास लावण्यात राजूर पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी नाशिक येथील एकास अटक केली आहे. संपत्तीच्या वादातून आरोपीने पित्यासह मुलाचा खून केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
तालुक्यातील वाकी येथे मृतदेह आढळल्यानंतर राजूर पोलिसांनी तपासासाठी दोन पथके तयार केली होती. एका पथकाला या मृतदेहाची ओळख पटविण्याट यश आले आहे. हा मृतदेह अमित नानासाहेब कापडणीस वय ३५ रा. पंडित कॉलनी गंगापूर रोड नाशिक यांचा असल्याचे समोर आले. एक महिन्यापूर्वी नाशिक येथील सरकारवाडा पोलीस ठाण्यात पिता पुत्र हरविल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यातील मुलाचा मृतदेह वाकी येथे आढळून आला होता.
पिता नानासाहेब कापडणीस यांच्याबाबत काही माहिती मिळत नव्हती तपास करीत असताना राजूर पथकास अशाच प्रकारे एक मृतदेह मोखाडा जि. पालघर येथे आढळून आला होता. त्यानुसार सरकारवाडा पोलिसांनी माहिती दिली. त्यानुसार सरकारवाडा पोलिसांनी केलेल्या तपासात तो मृतदेह नानासाहेब कापडवणीस यांचा असल्याचे निष्पन्न झाले.
वाचा: Ahmednagar News
सरकारवाडा पोलिसांनी अधिक तपास केला असता राहुल जगताप रा. पंडित कॉलनी नाशिक याने कापडणीस परिवाराची स्थावर मालमत्ता हडप करण्यसाठी खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Akole Unidentified bodies identified, murder from property