अकोले: निळवंडे जलाशयावर अंघोळीसाठी गेलेल्या दोन भावंडाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
अकोले | Drowned | Akole: अकोले तालुक्यातील राजूर (Rajur) येथील दोन भावंडाचा निळवंडे जलाशयाच्या पुलाच्या खाली अंघोळीसाठी गेलेल्या दोन भावंडाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडली.
समीर शांताराम पवार वय १४ आणि सोहम शांताराम पवार वय ११ रा. राजूर असे या पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या भावंडाची नावे आहेत.
राजूर येथील हे दोघे भावंडे आपल्या मुंबई येथील नातेवाईक यांना सोबत घेऊन राजूर येथून फिरण्यासाठी निळवंडे जलाशयावर सायंकाळी चार वाजता गेले होते. तेथील पाणी पाहून त्यांना पोहण्याचा मोह आवरला नाही. समीर व सोहम हे कपडे काढून जलाशयाच्या पुलाच्या खाली जाऊन अंघोळीसाठी पात्रात उतरले. आणि त्याचवेळी त्यांच्या बाजूला पाण्याचा फ्लो वाढून तेथे भवरा होऊन दोघेही पाण्यात ओढले गेले. यावेळी त्यांचे नातेवाईक आकाश जाधव व अर्जुन गायकवाड पुलावर उभे राहून जलाशयात पडणारे पाणी पाहत होते. त्यांनी समीर व सोहम यांना पाहण्याचा प्रयत्न केला मात्र दोघेही दिसले नाही. त्यांनी शोधाशोध केली. त्यांचे कपडे व चपला तेथे दिसू लागल्याने त्याचवेळी ही माहिती आकाशने वडिलांना कळविली. यावेळी नातेवाईक जमा झाले मुले पाण्यात वाहून गेल्याची संशय आल्याने स्थानिक मच्छिमार सोमनाथ मेंगाळ यांनी सायंकाळी नदीपात्रात टायर टाकून शोध घेतला. रात्री उशिरा त्यांना समीरचा मृतदेह सापडला. तर सोमवारी सकाळी सोहम चा मृतदेह आढळून आला. यावेळी नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. याप्रकरणी अकोले पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचनामा केला. अकोले ग्रामीण रुग्णालयात शवविचेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. समीर हा ९ वी इयत्ता व सोहम ६ वी इयत्ता श्री. स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय राजूर येथे शिकत होती. या घटनेची माहिती समजातच शिक्षक व विद्यार्थी यांच्यावर शोककळा पसरली आहे. तसेच मुलांची आई वडील यांच्यावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्दैवी घटनेचा माजी आमदार वैभव पिचड यांनी शोक व्यक्त केला.
Web Title: Akole Two siblings drowned in Nilwande reservoir