अकोले तालुक्यात भरदिवसा दिराने दोन भावजायांचा धारदार शस्त्राने निर्घुण खून
Akole Breaking News | Murder Case: पठार भागात बेलापूर गावात भर वस्तीत एका माथेफिरू दिराने किरकोळ जमिनीच्या व पैशाच्या वादातून दोन भावजायांचा धारदार कोयत्याच्या सहायाने निर्घुण खून केल्याची घटना.
अकोले: अकोले तालुक्यातील बेलापूर गावातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. बेलापूर गावात भर दिवसा दोन महिलांचा धारदार शस्त्राने तोडून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अकोले तालुक्यातील पठार भागात बेलापूर गावात भर वस्तीत एका माथेफिरू दिराने किरकोळ जमिनीच्या व पैशाच्या वादातून दोन भावजायांचा धारदार कोयत्याच्या सहायाने निर्घुण खून केल्याची घटना भर दुपारी एक ते दोन वाजेच्या सुमारास घडली.
दोन्ही महिला घटनास्थळावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या असताना नागरिकांनी अकोले पोलीस स्टेशनला घटनेची माहिती दिली. माहिती समजताच अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. अकोले पोलीस प्रशासनाने घटनेचा पंचनामा केला असून आरोपी दत्तात्रय प्रकाश फाफाळे रा. बेलापूर ता. अकोले याचा शोध घेत आहे. आरोपी घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. आरोपीची आईने डोळ्यादेखत घटना घडल्याचे सांगितले आहे. तिने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला आहे. किरकोळ जमिनीच्या व पैशाच्या वादातून दोन भावजायांचा धारदार कोयत्याच्या सहायाने वार करीत निर्घुण खून केल्याचा प्रकार घडला आहे.
आरोपीचे भावजयी उज्वला अशोक फाफाळे व वैशाली संदीप फाफाळे रा. बेलापूर या दोघींचा खून करण्यात आला असून अधिकचा तपास अकोले पोलीस प्रशासन करीत आहे.
Web Title: Akole taluka, two brothers were brutally murdered with sharp weapons
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study