सावधान: अकोले तालुक्यात करोना रुग्ण वाढीला सुरुवात
अकोले | Akole: अकोले तालुक्यात रुग्ण वाढीला लागलेला ब्रेक फेल होऊन करोना वाढीस लागला आहे. आज सोमवारी १६ करोनापॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्याची एकूण करोनाबाधितांची संख्या ३२४७ वर पोहोचली आहे. एकूण मृत्यू ४१ तर सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ४५ इतकी आहे.
आज प्राप्त झालेल्या अहवालात नवलेवाडी येथील ४९ वर्षीय पुरुष, पिंपळगाव निपाणी येथील ५५ वर्षीय महिला, ३७ वर्षीय पुरुष, हिवरगाव आंबरे येथील ५४ वर्षीय पुरुष, भैरवाडी कोतूळ येथे ७० वर्षीय पुरुष, ५१ व ५५ वर्षीय महिला, अकोले येथे १७ वर्षीयमुलगी, १४ वर्षीय मुलगी, १० वर्षीय पुरुष, ३५ वर्षीय महिला, ब्राम्हणवाडा ४८ वर्षीय पुरुष, देवी वाडी अंभोळ येथे ६३ वर्षीय महिला, गोविंदनगर अकोले येथे ३४ वर्षीय महिला, घाटगर येथे ६५ वर्षीय महिला, राजूर येथे ८० वर्षीय पुरुष, असे १६ जण बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ३२४७ वर पोहोचली आहे.
अकोलेतील एकाच कुटुंबातील ४ जण बाधित आढळून आले आहेत. मार्च महिन्यात पहिल्याच दिवशी बाधीतांमध्ये वाढ झालेली आहे.
जानेवारी २०२१= ५३ पॉझिटिव्ह
फेब्रुवारी २०२१ = ४९ पॉझिटिव्ह
मार्च २०२१ = १६ पॉझिटिव्ह
Web Title: Akole Taluka Started corona positive increase