अकोले तालुक्यात तमाशात राडा, २५ जणांवर गुन्हा
Akole Crime: तुळजाभवानी यात्रेनिमित्त ठेवलेल्या तमाशाच्या कार्यक्रमात तरुणांनी हुल्लडबाजी करत चांगलाच राडा केल्याची घटना.
अकोले: सध्या यात्रेचे दिवस सुरु आहेत. तालुक्यातील विविध गावांत यात्रा उत्सव साजरा होत आहे. असेच तालुक्यातील तांभोळ येथे गुरुवारी तुळजाभवानी यात्रेनिमित्त ठेवलेल्या तमाशाच्या कार्यक्रमात तरुणांनी हुल्लडबाजी करत चांगलाच राडा केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आठ तरुणांसह अज्ञात १५ अशा २५ जणांवर अकोले पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
यात्रेचा तमाशा चालू असताना, काही हुल्लडबाज तरुणांनी आरडाओरडा, गोंधळ करून तमाशा बंद पाडण्यात आला. यात्रा कमिटी अध्यक्ष व सदस्य यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. तसेच तमाशाच्या स्टेजवरील कॅमेऱ्याचे नुकसान केले. तमाशा व वाद्याचेही साहित्य तोडफोड करून नुकसान केले. याबाबत सरपंच जयश्री सुधीर माने यांच्या फिर्यादीवरून सुनील भाऊ पवार, विलास अर्जुन मोहिते, राहुल संजय चव्हाण, रोहिदास बाळासाहेब जाधव, जनार्दन ज्ञानेश्वर साळुंखे, अनिल शंकर साळुंखे, तुषार निवृत्ती चव्हाण, सूरज अर्जुन पवार (सर्व रा. तांबोळ) तसेच इतर अनोळखी १० ते १५ व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Akole taluka, riots, crime against 25 people
See Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App