३५ वर्षांनी मित्र आले एकत्र
अकोले (प्रतिनिधी): सन १९८३-८४ मध्ये १० वी चे शिक्षण पूर्ण झाले. प्रत्येक जण नोकरी व्यवसायात अडकून गेल्याने एकमेकांना जणू विसरले. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून अजय जाजू यांनी सर्वांना एकत्र केले. त्यातील १२ मित्र आज ३५ वर्षांनी एकमेकांना भेटले आणि अनेक आठवणींना उजाळा मिळाला.
You May Also Like: Bollywood Actresses Priyanka Chopra, Mallika successful adult Movie
व्हाट्सएप ग्रुप च्या माध्यमातून संपूर्ण भारतातील ८५० जाजू परिवार एकत्र करून त्यांचे राजस्थान मध्ये दोन यशस्वी स्नेहमिलन सोहळे आयोजित करणारे सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार अजय जाजू यांनी वर्गमित्र एकत्र करून स्नेहमिलन सोहळा करण्याचे ठरविले.
आज अजय जाजू, गणेश जोशी, शफिक शेख, कैलास गुजर, सुनील सोनार, बादशहा ताजणे, रमेश चौधरी, लक्ष्मण घायवट, मनोज साकी, दिलीप झोळेकर, सौ. दिलशाद शेख हे सर्व एकत्र आले. यानिमित्ताने अनेक आठवणींना उजाळा मिळाला. यावेळी आयाज शेख, एस. पी. देशमुख, मोरेश्वर धर्माधिकारी, प्रा. डी के वैद्य, शिरीष देशपांडे, दिलीप क्षिरसागर हे गुरुवर्य देखील उपस्थित होते.
वर्गातील इतर मित्रांच्या आठवणी आल्या, तर काहीनी दुर्दैवाने निरोप घेतला ते ऐकून डोळ्याच्या कडाही पाणावल्या. कोणी आपल्या सुनेचे गोडवे गात होते, तर कोणी जावयाचे मोठेपण सांगत होते. आता सर्वांची मुले देखील नोकरी व्यवसायास लागली.
यानिमित्ताने सर्वांच्या कार्याची ओळख देखील एकमेकांना झाली. विद्यार्थी घडविण्याचे कार्याबरोबरच प्रा. लक्ष्मण घायवट हे महाविद्यालयाच्या माध्यमातून अनाथांचे अश्रू पुसण्यासाठी जातात, तर सामाजिक कामाद्वारे सर्वसामान्यांची मदत करणारे, आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांना एकत्र आणणारे अजय जाजू, एकसाईज ऑफिसर ची आई सौ. दिलशाद शेख, तर गणेश जोशी, बादशहा ताजणे, दिलीप झोळेकर हे भावी पिढी घडविण्याचे काम करतात.
व्यवसायाच्या माध्यमातून नावलौकिक मिळविणारे कैलास गुजर, रमेश चौधरी, शासकीय नोकरीच्या माध्यमातून गाव विकसित करण्यासाठी प्रयत्न करणारे सुनील सोनार तर खाजगी नोकरी सांभाळून ट्रॅकिंग ची आवड तसूभरही कमी न होऊ देणारा मनोज साकी, ठेकेदारीचा व्यवसाय सांभाळून मैत्री जपणारा शफिक या सर्वांच्या आठवणीच्या उजाळ्याने दिवस कोठे गेला हे कळले देखील नाही. आठवणींची शिदोरी उरी बाळगून सर्वांनी एकमेकांना निरोप दिला, पुन्हा उर्वरित मित्र-मैत्रिणीसह एकत्र येऊन काही विधायक पाऊल उचलण्याचा.
Website Title: akole taluka news After 35 years the friends came together
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा. किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.
आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा
Get Latest Marathi News, Marathi Batmya Today Live & Marathi News Live from Politics, Sports,Entertainment News, Sangamner Taluka News, Akole Taluka News, Marathi Batmya Live and मराठी बातम्या लाइव from all cities of Maharashtra.
प्रमोटेड बातम्या: