अकोले तालुक्यात करोनाबाधितांच्या रुग्णसंखेत वाढ
अकोले | Akole: अकोले तालुक्यात मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार १० जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्याची एकूण रुग्ण संख्या ३४०७ वर पोहोचली आहे.
२०२१ या वर्षात जानेवारी महिन्यात ५३, फेब्रुवारी महिन्यात ५३ तर सुरु असलेल्या मार्च महिन्यात आतापर्यंत १८१ रुग्णांची वाढ झाली आहे तर पाच रुग्ण हे मयत झाले आहेत. या वर्षात एकूण २८३ बाधित रुग्ण आढळून आले आहेत.
मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार बहिरवाडी येथे २९ वर्षीय पुरुष, अमृतनगर नवलेवाडी येथे ६३ वर्षीय महिला, अकोले येथील २४ वर्षीय पुरुष, हिवरगाव आंबरे येथे ६५ वर्षीय महिला, राजूर येथे ५७ वर्षीय पुरुष, उंचखडक येथे ८१ वर्षीय पुरुष. माळीझाप येथे २१ वर्षीय पुरुष, शेरणखेल येथे २८ वर्षीय महिला, रुंभोडी येथे ६५ वर्षीय पुरुष, डोंगरगाव येथे ४४ वर्षीय पुरुष असे १० जण बाधित आढळून आले आहेत. मास्क वापरा करोना टाळा.
Web Title: Akole Taluka Corona Report Today 10 Positive