Akole: अकोले तालुक्यात आज सर्वाधिक ४१ करोनाबाधित
अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज मंगळवारी आत्तापर्यंतची सर्वाधिक करोनाबाधितांचा आकडा प्राप्त झाला आहे. आज तालुक्यात तब्बल ४१ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्याची एकूण करोनाबाधितांची संख्या ४४९ इतकी झाली आहे.
अकोले तालुक्यातील रेडे येथे ५५ वर्षीय महिला, ३४ वर्षीय पुरुष, २७ वर्षीय पुरुष, ७ वर्षीय मुलगी, ५५ वर्षीय पुरुष, ५२ वर्षीय पुरुष, २४ वर्षीय पुरुष, १२ वर्षीय मुलगी, ३२ महिला असे ९ करोनाबाधित आढळून आले आहेत. नवलेवाडी येथे २५ वर्षीय तरुण, देवठाण येथे ५० वर्षीय पुरुष, धुमाळवाडी येथे ५४ वर्षीय पुरुष, २७ वर्षीय महिला, ४० वर्षीय महिला, ३५ वर्षीय पुरुष, ३३ वर्षीय महिला, ५ वर्षीय मुलगा, २१ वर्षीय तरुणी, ४५ वर्षीय पुरुष, १४ वर्षीय पुरुष, २६ वर्षीय पुरुष, १५ वर्षीय मुलगा, १७ वर्षीय तरुणी, खानापूर येथे ५३ वर्षीय पुरुष, महालक्ष्मी कॉलनी २८ वर्षीय पुरुष, अम्भोळ येथे ३५ वर्षीय पुरुष, ब्राम्हणवाडा येथे ४५,८,५,८५,४५ वर्षीय महिला तर ५५,२३,८०,५५,२६,२३,३५ वर्षीय पुरुष, जामगाव येथे ४४ वर्षीय पुरुष, हनुमान मंदिराजवळ अकोले येथे ४९ वर्षीय पुरुष, कोतूळ येथे ६६ वर्षीय पुरुष असे एकूण ४१ करोनाबाधित आढळून आले आहेत.
Web Title: Akole taluka 41 corona infected today