Akole: अकोले तालुक्यात आज आणखी ३ करोना रुग्णांची वाढ
Akole | अकोले: अकोले तालुक्यात आज सोमवारी आणखी तीन रुग्णांची भर पडली आहे. अकोले तालुक्यात आज देवठाण व खिरविरे येथे तीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे करोनाबाधितांची संख्या २०८ वर पोहोचली आहे.
आज प्राप्त झालेल्या अहवालात खिरविरे येथील २८ वर्षीय तरुण करोनाबाधित आढळून आला आहे. देवठाण येथे २४ वर्षीय तरुणी व १८ वर्षीय तरुण करोनाबाधित आढळून आला आहे.
अकोले तालुक्यात १५६ व्यक्ती करोनामुक्त झाल्या आहेत. पाच जणांचा करोनाने बळी घेतला आहे. तर सध्या ४७ जणांवर उपचार सुरु आहेत.
अहमदनगर येथील प्रयोगशाळेत तालुक्यातील ४७ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अद्याप ते अहवाल प्रतीक्षेत आहेत.
वाचकहो, ‘युवा बात संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.
Website Title: Akole taluka 3 corona infected today