Home अकोले अकोले पोलिसांचा हॉटेलवर छापा अन… चौघांना ठाण्यात

अकोले पोलिसांचा हॉटेलवर छापा अन… चौघांना ठाण्यात

Breaking News | Akole Raid: राजूर रोडवरील एका हॉटेल, लॉजिंगवर अकोले पोलिसांनी काल बुधवारी दुपारी छापा टाकला. 

Akole police raid hotel

अकोले:  येथील राजूर रोडवरील एका हॉटेल, लॉजिंगवर अकोले पोलिसांनी काल बुधवारी दुपारी छापा टाकला. यामध्ये एका अल्पवयीन मुलीबरोबर एक तरुण, एक महिला व पुरूष, असे दोन जोडपे सापडले. पोलिसांनी या चौघांना पोलीस ठाण्यात आणले असून रात्री उशीरापर्यंत पोलिसांची कारवाई सुरु होती.

अकोले शहर व परिसरात हॉटेल, लॉज परिसरात अनेक अवैध प्रकार सुरु असल्याची चर्चा असताना, काल बुधवारी दुपारी अकोले पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अकोले शहरातील राजूर रोडवरील एका हॉटेल, लॉजिंगवर पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या

मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक खांडबहाले यांच्या पथकाने छापा मारला.

यावेळी हॉटेलच्या वरच्या मजल्यावरील रुममध्ये एक अल्पवयीन मुलगी एका मुलासह तसेच एक विवाहित पुरुष व विवाहित महिला, अशी दोन जोडपे आढळुन आले. याप्रसंगी पोलिसांनी हॉटेलचे रजिस्टरची तपासणी केली. त्यानंतर दोन्ही जोडप्याना अकोले पोलीस ठाण्यात घेऊन आले. यावेळी त्यांचे नातेवाईकही पोलीस ठाण्यात आलेले होते. पोलीस निरीक्षक बैठकीवरुन सायंकाळी आल्यानंतर त्यांना त्याच्यासमोर हजर करुन रात्री उशीरापर्यंत कारवाई सुरु होती.

Web Title: Akole police raid hotel

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here