Home बीड दोन मुलांना जन्म दिला आणि ते एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही: धनंजय...

दोन मुलांना जन्म दिला आणि ते एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही: धनंजय मुंडेना धक्का

Dhananjay Mundhe and Karuna Sharma: धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या करुणा शर्मा यांच्याशी मुंडे यांचे संबंध प्रथमदर्शनी ‘लग्नासारखेच’ असल्याचे दिसते.

Dhananjay Mundhe and Karuna Sharma News

मुंबई : अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या करुणा शर्मा यांच्याशी मुंडे यांचे संबंध प्रथमदर्शनी ‘लग्नासारखेच’ असल्याचे दिसते. त्यामुळे करुणा घरगुती हिंसाचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत दिलासा मिळण्यास पात्र आहेत, असे निरीक्षण नोंदवित सत्र न्यायालयाने करुणा यांना देखभाल खर्च देण्याचा आदेश मुंडे यांना ५ एप्रिल रोजी दिला होता. त्याची प्रत बुधवारी उपलब्ध झाली. मुंडे यांनी करुणा यांना १ लाख २५ हजार आणि मुलीला ७५ हजार रुपये देखभाल खर्च द्यावा या दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशाला सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. त्यांचे अपील फेटाळताना अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्या. शेख अकबर शेख जाफर यांनी शनिवारी वरील निरीक्षण नोंदविले आहे.

न्यायाधीशांची निरीक्षणे…

करुणा यांचा मुंडे यांच्याशी झालेला विवाह कायदेशीर आहे की नाही? यावर संबंधित न्यायालय निर्णय घेईल. मात्र, मुंडे यांचे करुणा यांच्याशी असलेले संबंध ‘लग्नासारखे’ आहेत. त्यांनी दोन मुलांना जन्म दिला आहे आणि ते एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही.

एका प्रसिद्ध राजकीय व्यक्तीची जीवनशैली विचारात घेता करुणा यांच्यासाठी दंडाधिकाऱ्यांनी ठरवलेली देखभालीची रक्कम योग्य आहे. करुणा आणि त्यांच्या मुलांना मुंडे उपभोगत असलेली जीवनशैली मिळायला हवी.

करुणा यांच्याकडे उत्पन्नाची पुरेशी साधने आहेत, असे मान्य केले तरी मुंडे यांच्यासारख्या जीवनशैलीस त्या पात्र आहेत, असे न्यायालयाने म्हटले आहे.

Web Title: Dhananjay Mundhe and Karuna Sharma News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here