अकोले: इंदोरी येथील उच्चशिक्षित तरुणाने केली आत्महत्या
अकोले: इंदोरी येथील उच्चशिक्षित तरुणाने केली आत्महत्या
अकोले: विषारी औषध पिऊन इंदोरी येथील उच्चशिक्षित तरुणाने आपली जीवनयात्रा संपवली. अभिजित सीताराम नवले (वय २३) असे या मयत तरुणाचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, अभिजित हा सकाळी दररोजप्रमाणे उठून गायीचे दुध काढून घरापासून काही अंतरावर असलेल्या शेतामध्ये फेरफटका मारण्यासाठी गेला होता. शेताच्या जवळ असलेल्या सिताफळीच्या बागेत त्याने विषारी औषध घेऊन तो तिथेच पडून राहिला. सकाळी ८:३० च्या सुमारास सिताफळीच्या छाटणीसाठी गेलेल्या मजुराच्या हि गोष्ट लक्षात आल्यावर त्याने तातडीने त्याच्या घरातील व्यक्तींशी संपर्क केला. घरातील पुरुष मंडळीने घटनास्थळी धाव घेतली व त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तपासणीनंतर त्याला मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत अभिजित हा उच्च शिक्षित असून अत्याधुनिक तंत्रज्ञांनाने शेती करत होता. मात्र अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरासह इंदोरीतील नागरिकांना धक्का बसला आहे. या तरुणाने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही. त्याच्यावर शोकाकुल वातावरणात काल प्रवरातीरी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, आजी, चुलते, चुलत भाऊ, चुलत बहिणी असा मोठा परिवार आहे. प्रगतशील शेतकरी सीताराम नवले यांचा तो मुलगा होता.
पहा बातमी : मेंढ्या चारण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू
Website Title: Akole News youth of Indori committed suicide
संगमनेर न्यूज | Sangamner News | वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.
आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा
प्रमोटेड बातम्या: