Nagar Panchayat Election: अकोले नगरपंचायत ४ प्रभागातील आरक्षण जाहीर
अकोले | Akole Nagar Panchayat Election: अकोले नगरपंचायत १७ प्रभागापैकी १३ प्रभागांचे मतदान प्रक्रिया पार पडली असून अकोले नगरपंचायत निवडणुकीतील १७ प्रभागापैकी ४ ओ.बी.सी आरक्षित प्रभागाचे मा.न्यायालयाने सदर जागा सर्वसाधारण करुन निवडणूक घेण्याचे आदेशाने त्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला आहे. आज या चार प्रभागातील ५० टक्के महीला आरक्षण निवडणूक आधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॅा.शशिकांत मंगरुळे यांचे अध्यक्षतेखाली काढण्यात आले यामध्ये प्रभाग क्र ११ व प्रभाग क्र १३ मध्ये सर्वसाधारण महीला व प्रभाग क्र ४ व १४ मध्ये सर्वसाधारण व्यक्ती आरक्षण लहान मुलांचे हस्ते चिठ्ठी द्वारे काढण्यात आले
२१ डिसेंबर रोजी अकोले नगरपंचायतच्या १७ पैकी १३ प्रभागातील निवडणुकीचे मतदान झाले आहे यावेळी राहिलेल्या चार जागा ओ.बी.सी आरक्षित होत्या मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर या चार जागाचे ओ.बी.सी आरक्षण रद्द होऊन सर्वसाधारण मधून निवडणूक येत्या १८ जानेवारी २०२२ रोजी होत आहे.यासाठी आज या चार प्रभागातील ५० टक्के महिलांचे आरक्षण सोडत तहसिल कार्यालयात उपविभागीय अधिकारी डॅा.शशिकांत मंगरुळे यांचे अध्यक्षतेखाली व सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा नगरपंचायत मुख्याधिकारी विक्रम जगदाळे, तहसीलदार सतिश थेटे यांचे उपस्थित काढण्यात आले.यावेळी लहान मुलगा रिवांश माघाडे याचे हस्ते चिठ्ठी काढण्यात आली सुरूवातीला या चार प्रभाग पैकी मागील पंचवार्षिक काळात महीला आरक्षण असलेला प्रभाग ४ हा पुन्हा महीला येऊ नये म्हणून तेथे सर्वसाधारण व्यक्ती म्हणून. जाहिर करून उर्वरित प्रभाग ११ ,प्रभाग १३ व प्रभाग १४ या तीन प्रभागाच्या चिठ्ठ्या टाकून त्यातुन दोन महीला आरक्षणाचे चिठ्या काढण्यात आल्या. यावेळी पहिली चिठ्ठी प्रभाग १३ व दुसरी प्रभाग ११ निघाल्याने या दोन प्रभागात सर्वसाधारण महीला आरक्षण व प्रभाग क्र. ४ व प्रभाग क्र १४ मध्ये सर्वसाधारण व्यक्तीचे आरक्षण आले. या चार जागांसाठी १८ जानेवारी २०२२ रोजी मतदान होणार असून मतमोजणी १९ जानेवारी रोजी होणार आहे.
माहिती संकलन: अलताफ शेख, अकोले
Web Title: Akole Nagar Panchayat Election for 4 Seats