अकोले तालुक्यातील दुर्दैवी घटना: चार वर्षीय चिमुकलीचा शेततळ्यात बुडून मृत्यू
अकोले | Akole: अकोले तालुक्यातील गणोरे येथील एका चिमुकलीचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सोमवारी सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.
समृद्धी स्वप्नील खतोडे वय ४ असे या मयत चिमुकलीचे नाव आहे. गणोरे येथील समृद्धी सकाळी घराजवळील अंगणात खेळत होती. शेजारीच असलेल्या शेततळ्याचे गेट उघडे राहिल्याने खेळता खेळता समृद्धी ही तळ्याकडे गेली असता तिचा पाय घसरल्याने ती तळ्यात पडली. घरातील सर्व माणसे गावात गेली होती. वडील हे ग्रामपंचायत निवडणुकीतील मतमोजणी साठी अकोले येथे गेले होते.
त्यांना सदर घटनेची माहिती समजताच ते तातडीने घरी आले, तोपर्यंत तिला तळ्यातून बाहेर काढून खासगी दवाखान्यात नेण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेबाबत राहुल खतोडे यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली. मुलीच्या पार्थिवाचा पंचनामा करण्यात आला. दुपारी चार वाजता तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. अधिक तपास हवालदार बाळासाहेब गोराणे हे करीत आहे.
Web Title: Akole Four-year-old Chimukali drowned in a field