अकोले तालुक्यातील माजी जि.प. सदस्य यांच्याविरोधात अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल
अकोले | Akole: जिल्हा परिषद माजी सदस्य बाजीराव शंकर दराडे रा. समशेरपूर यांच्या विरोधात जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर नामदेव आनंद डामसे रा. शेणीत यांनी मद्यपान करून शिवीगाळ केल्याप्रकरणी जिल्हा परिषद सदस्य सुषमा बाजीराव दराडे यांनी तक्रार दाखल केली आहे.
आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे डामसे शेतकरी गट शेणीत या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नामदेव डामसे व सागर विष्णू तळपाडे रा. सांगावी ता. अकोले हे दोघे रविवारी ११ ऑक्टोबर २०२० रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास जिल्हा परिषद सदस्या सुषमा बाजीराव दराडे यांना विकास कामांची चर्चा, विचारपूस करण्यासाठी गेले होते. त्यावेळेस बाजीराव दराडे हे प्रत्यक्ष भेटले. नळ योजना उद्घाटन, रस्ता डांबरीकरण उद्घाटन वेळी काम १५ दिवसांत सुरु करण्याचे आश्वासन दिले होते मात्र अद्याप काम सुरु झाले नाही. रस्त्याने जाण्या येण्यासाठी लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. असे दराडे यांना सांगत होते. या संभाषणा दरम्यान चर्चेची शुटींग काढत असल्याचा संशय बाजीराव दराडे यांना आला. तेव्हा ते दोघांवर धावून गेले, अत्ताच्या आत्ता चालते व्हा. या दोघांना शिवीगाळ केली. तसेच तुमची हिम्मत कशी झाली असे म्हणून डामसे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ठार मारून टाकीन अशी धमकी दिली. डामसे यांच्या ताब्यातील मोबाईल त्यांनी काढून घेतला. त्यातील सर्व माहिती डिलीट करून दुसऱ्या दिवशी तो मोबाईल सांगवी येथे दराडे यांनी स्वतः आणून दिला. डामसे यांनी दिलेल्या फिर्यादीत बाजीराव दराडे यांनी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली असे फिर्यादीत म्हंटले आहे.
दरम्यान नामदेव आनंद डामसे यांनी दिनांक १० ऑक्टोबर २०२० रोजी दारू पिऊन बेकायदा घरात घुसून शिवीगाळ व दमदाटी केल्याची तक्रार जिल्हा परिषद सदस्या सुषमा दराडे यांनी दाखल केली आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Ahmednagar News, and Latest Marathi News Live
Web Title: Akole Former Z.P. Bajirav Darade Atrocity charges filed against members