Home अकोले अकोले तालुक्यात अवैध धंद्यावर कारवाई, १५ लाख ११ हजारांचा मुद्देमाल जप्त

अकोले तालुक्यात अवैध धंद्यावर कारवाई, १५ लाख ११ हजारांचा मुद्देमाल जप्त

Akole Crime Action on illegal trade 

अकोले | Akole Crime: अकोले तालुक्यात मंगळवारी अवैध दारू विक्री, वाळू वाहतूक, तीरट जुगार खेळण्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

मंगळवारी अवैध दारू विक्री करणारे यांच्यावर कारवाई करत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे. शहरातील शाहूनगर परिसरातील अवैध दारू विक्री करणारे काशिनाथ भीमराव शिंदे व सुनील अर्जुन मेंगाळ या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून ३४६० रुपयांची देशी दारू जप्त केली आहे.

बुधवारी देवठाण शिवारात शेतातील एका शेडमध्ये पैसे लावून तिरट जुगार खेळताना राजू बोडखे, मच्छिंद्र लक्षमण साळुंके रा. नवलेवाडी, गणेश नामदेव बोडके रा. देवठाण, सोमनाथ बारकू उघडे रा, वीरगाव, अनुप केदार नापेड रा. संगमनेर या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो ताब्यात घेण्यात आला असून शुभम संजय चव्हाण यास अटक केली आहे. एकूण १५ लाख ११ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Web Title: Akole Crime Action on illegal trade 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here