Home क्राईम Sangamner: संगमनेरमध्ये अवैध दारू विक्रेत्यांवर छापे

Sangamner: संगमनेरमध्ये अवैध दारू विक्रेत्यांवर छापे

Raids on illegal liquor dealers in Sangamner

संगमनेर | Sangamner: गावठी दारू बनविणारे व विक्री करणाऱ्यांवर शहर पोलिसांनी मंगळवारी छापे टाकत साडे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिखली, खराडी, राजापूर, समनापूर व देवगाव या भागातून २० हजार रुपयांची गावठी दारू व दारू बनविण्याचे साहित्य तसेच एक स्विफ्ट कार (एमएच १४ बीआर ७४००) पोलिसांनी जप्त केले आहे. पोलीस नाईक राजेश जगधने, कॉन्स्टेबल सचिन उगले, महादेव हांडे, अविनाश बर्डे यांच्या फिर्यादीवरून रामदास रोहम अरगडे मळा, गुंजाळवाडी, अर्जुन पवार रा. खराडी, राजू पिपळे रा. राजापूर, शौकत आयुब शेख रा. समनापूर, राजहंस रतन शिंदे रा. देवगाव या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छापे टाकताच अवैध व्यावसायिक फरार झाले आहेत.  

खराडी गावात कारवाई करत अर्जुन भागाजी पवार यांच्याकडून देशी दारूच्या २ हजार ४९६ रुपयांच्या ४८ बाटल्या जप्त करण्यात आल्या.

चिखली गावाच्या पुढे अकोलेकडे जाणाऱ्या रस्त्यावर कार मधून देशी दारू वाहतूक व विक्री रामदास सूर्यभान रोहम याच्यावर गुन्हा दाखल

राजापूर शिवारात म्हाळुंगी नदीपात्रात झाडाच्या आडोशाला गावठी दारू हात भट्टीवर राजू पिंपळे रा. राजापूर याच्यावर कारवाई

समनापूर येथे रात्री आठ वाजेच्या सुमारास हॉटेलच्या पाठीमागे दारू विक्री  शौकत आयुब शेख रा. समनापूर याच्यावर गुन्हा दाखल

राजहंस रतन शिंदे रा. देवगाव घराच्या आडोशाला दारू विक्री करताना आढळून आला.

Web Title: Raids on illegal liquor dealers in Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here