Accident: अकोले तालुक्यात दुर्दैवी घटना: रात्री वीज पडल्याने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
अकोले | Accident: सोमवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास सर्वत्र अवकाळी पाऊस व विजेचा कडाका रात्रभर सुरू होता. या वादळात अकोले तालुक्यातील कळस खु येथिल कै. कैलास पुंजा डोके या शेतकऱ्याचा रात्री 1:00 च्या सुमारे गाढ झोपेत असताना वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे .
या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. घराच्या पडवीत झोपलेले असताना झोपेतच अंगावर वीज पडून जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी चार मुली मुलगा एक असा एकूण पाच जणांचा मोठे कुटुंब होत घरातील कर्ता पुरुष गेल्याने मोठ दुःख या कुटुंबाला झाले असून सदरील घटना समजतात मा. उपसभापती श्री मारुती मेंगाळ, अगस्ति सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री सुरेश गडाख , पंचायत समिती सदस्य श्री गोरख पथवे आदिवासी ठाकर समाज संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्री दिपक पथवे, तालुका अध्यक्ष श्री सुरेश पथवे, सचिव श्री बाळासाहेब मधे श्री राजू सावंत, श्री गुलाब तेलम , श्री गोरख डोके, श्री विलास अगीवले, श्री भरत गिऱ्हे, श्री काळू पथवे या सहित अनेक कार्यकर्त्यांनी ग्रामीण रुग्णालय येथे जाऊन त्या कुटुंबातील इतर सदस्यांची भेट घेतली दुःखात घटने बाबत हळहळ व्यक्त केली त्या कुटुंबाला भावनिक आधार दिला. विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा झालेला दुर्दैवी मृत्यू अत्यंत दुःखत घटना असून सर्वत्र या घटनेने हळहळ व्यक्त होताना दिसत आहे.
Web Title: Akole Accident unfortunate death of a farmer due to a lightning strike at night