Home अकोले अकोले: अभिनव चा ओम शेटे रशिया मध्ये ‘फस्ट इंडियन फाईटर युथ ने...

अकोले: अभिनव चा ओम शेटे रशिया मध्ये ‘फस्ट इंडियन फाईटर युथ ने सन्मानित’

अभिनव चा ओम शेटे रशिया मध्ये ‘फस्ट इंडियन फाईटर युथ ने सन्मानित’

अकोले: आंतरराष्ट्रीय पातळीवरील इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फुल कॉन्टॅक्ट फाईट च्या वतीने नुकत्याच रशिया येथे पार पडलेल्या फुल कॉन्टॅक्ट फाईट स्पर्धेमध्ये अभिनव शिक्षण संस्थेच्या मारुतीराव कोते अभिनव पब्लिक स्कूल चा विद्यार्थी ओम आत्माराम शेटे सहभागी झाला . भारत देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ओम याने उत्कृष्ट प्रदर्शन करत चौथे स्थान मिळविले .

You May Also Like:Shahid Kapoor wife age | Mira Rajput

फुल कॉन्टॅक्ट फाईट या प्रकारात आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत देशाचे प्रतिनिधित्व करणारा ओम हा पहिला भारतीय असल्यामुळे फेडरेशन ने त्याला ‘फस्ट इंडियन फाईटर युथ’ हे प्रमाणपत्र देवून सन्मानित केले. त्याच्या सोबत कोच म्हणून अभिनव चे क्रीडा शिक्षण सचिन गुंजाळ हे होते. अकोले तालुक्यातील विद्यार्थ्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिधित्व केल्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. ओम हा अभिनव शिक्षण संस्थेत सेवेत असलेले कर्मचारी आत्माराम शेटे यांचा मुलगा आहे.

You May Also LikeSonam Kapoor age | Sonam Kapoor Biography

अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव नवले व विश्वस्त मंडळ यांनी ओम यास संधी उपलब्ध करून दिल्यामुळे ओम प्रमाणे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात आंतर राष्ट्रीय पातळीवर यश मिळवत आहेत.त्याच्या या यशाबद्दल अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव नवले, उपाध्यक्ष सुरेश कोते , कोषाध्यक्ष भाऊसाहेब नाईकवाडी विश्वस्त मंडळ, प्राचार्या अल्फोन्सा डी., प्राचार्या अपर्णा श्रीवास्तव आदींनी अभिनंदन केले.

Fashion Ad

आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here