Home अहमदनगर सकाळी अजितदादांनी दम दिला, तरीही दुपारी शरद पवारांच्या गटात, निलेश लंके नगरमधून...

सकाळी अजितदादांनी दम दिला, तरीही दुपारी शरद पवारांच्या गटात, निलेश लंके नगरमधून तुतारी फुंकणार

Breaking News | Ahmednagar Loksabha Election: अजित पवारांच्या इशाराला न जुमानता निलेश लंके शरद पवारांच्या गोटात दाखल झाले.

Ajit Dada breathed his last, yet in the afternoon Sharad Pawar's faction

Nilesh Lanke: गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. दरम्यान, सकाळी लंकेंच्या प्रवेशावरुन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाष्य केलं होतं. “निलेश लंकेंनी चुकीची भूमिका घेऊ नये, अन्यथा त्यांची आमदारकी जाईल”, असा दम अजित पवारांनी लंके यांना दिला होता. मात्र, अजित पवारांच्या इशाराला न जुमानता निलेश लंके शरद पवारांच्या गोटात दाखल झाले आहेत. आमदार निलेश लंके यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे.  पुण्यात पत्रकार परिषदत घेऊन निलेश लंके यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी बुधवारी (दि.14) जाहीर केली. या यादीत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांच्या नावाचाही समावेश आहे. सुजय विखे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान, विखेंविरोधात तगडा उमेदवारी देण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील आहे. सुजय विखेंविरोधात निलेश लंके  यांना उमेदवारी देणार असल्याचे बोलले जात आहे. कोरोना काळात केलेल्या कामामुळे निलेश लंकेंच्या  मागे लोक उभा राहू शकतात. शिवाय त्यांच्या संपर्काचा फायदा निवडणुकीत होऊ शकतो. त्यामुळे शरद पवार गट निलेश लंकेंना  उमेदवारी देण्याच्या तयारीत आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून पारनेरचे आमदार निलेश लंके शरद पवार यांच्या गटात जाणार अशा चर्चा सुरु होत्या. मात्र, आमदार लंके यांनी त्यावेळी या बातम्या फेटाळल्या होत्या. मात्र, काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत “मी अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही, मात्र राजकारण कधीही पलटू शकतं”,असं सूचक विधान निलेश लंके  यांनी केले होते. त्यामुळे पुन्हा एकदा लंके शरद पवारांच्या गटात जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता.

Web TItle: Ajit Dada breathed his last, yet in the afternoon Sharad Pawar’s faction

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here