Rape: विधवा महिलेवर युवकाने केला बलात्कार
अहमदनगर | Ahmednagar: एका विधवा महिलेवर वारंवार अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे, याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात विधवा महिलेने फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात साजिद अब्दुललतीफ शेख रा. बोल्हेगाव याच्याविरुद्ध बलात्कार व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा नोंद झाला आहे.
पिडीत महिलेच्या पतीने निधन झाल्यामुळे ती मुलांसह एका उपनगरात तिच्या माहेरी राहत होती. तिची सजितसोबत ओळख झाली. याचा गैरफायदा घेत साजीदाने तिच्याकडे लग्नाची मागणी धरली. यासाठी फिर्यादी, तिचे मुले आई व भावाला जीवे मारण्याची धमकी दिली. साजिदने या विधवा महिलेस मे २०२१ मध्ये त्याच्या घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केला असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादीवरून त्याच्यावर बलात्कार (Rape) व जीवे मारण्याची धमकी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Ahmednagar young man rape a widow