Murder: तरुणाचा खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप
अहमदनगर | Murder: मोटारसायकलच्या वादातून भिंगार येथे एका तरुणाचा खून (Murder) केल्याप्रकरणी दोन आरोपींना जिल्हा न्यायालयाने जन्मठेप व १ हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. एका महिला आरोपीला संशयाचा फायदा देत तिची निर्दोष मुक्तता केली. जिल्हा न्यायाधीश एम.व्ही. कुर्तडीकर यांनी मंगळवारी खटल्याचा निकाल दिला.
रोहित रमेश कांबळे, शुभम शाम कांबळे यांना शिक्षा ठोठाविण्यात आली. माला रमेश कांबळे हिची निर्दोष मुक्तता झाली. आरोपींनी शेखर देविदास गायकवाड याचा खून(Murder) केला होता. आरोपी शुभम व मयत शेखर यांच्यात मोटारसायकलीवरून वाद होते.
१ मार्च २०१७ रोजी सायंकाळी शुभम याने शेखर याला भिंगार येथील पालखीच्या ओढ्याजवळ बोलावून घेतले. यावेळी शुभम याने शेखर मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपी रोहित याने सुरीने शेखरच्या पाठीवर व छातीवर वार केले. यावेळी शेखर याचा भाऊ सागर व एका साक्षीदाराने शेखर यास सोडविण्यासाठी प्रयत्न केला. याचवेळी शुभम याने सिमेंटचा ब्लॉक शेखरच्या डोक्यात घातला. शेखर यास रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी भिंगार पोलीस ठाण्यात सागरने फिर्याद दिली. यावरून गुन्हा दाखल झाला होता.
Web Title: Ahmednagar Young man Murder