Home अहमदनगर अहमदनगर: घराला लागलेल्या आगीत महिलेचा भाजून मृत्यू

अहमदनगर: घराला लागलेल्या आगीत महिलेचा भाजून मृत्यू

Ahmednagar Woman burnt to death in house fire

अहमदनगर | Ahmednagar Fire: बालिकाश्रम रोड परिसरात महावीरनगरमध्ये भागात एका घराला लागलेल्या आगीत एका महिलेचा भाजून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजले नाही. याप्रकरणी तोफखाना पोलीस तपास करीत आहे.

वैशाली विठ्ठल नन्नवरे (वय-45) असे मयत महिलेचे नाव आहे. महावीरनगर भागामधील एका घरातून सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास धूर येऊ लागला. नेमका धूर कशाचा आहे,  याची माहिती आजूबाजूच्या लोकांना कळाल्यानंतर त्यांनी तात्काळ महापालिकेच्या अग्निशमन दलाला त्याची माहिती दिली. अग्निशमन दलाचे प्रमुख शंकर मिसाळ हे अग्निशमन दलाच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी काही मिनिटांत आग आटोक्यात आणली. दरम्यान या आगीत भाजलेल्या वैशाली नन्नवरे यांना तात्काळ उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

वाचा: Ahmednagar News

या घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी या पथकासह घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी घटनेची माहिती घेतली असून नेमकी आग (Fire) कशामुळे लागली, किंवा हा अन्य काही प्रकार आहे का? याचा शोध पोलीस घेत असल्याचे सांगितले.

Web Title: Ahmednagar Woman burnt to death in house fire

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here