अहमदनगर: महिलेस फायटरने मारहाण करीत विनयभंग
अहमदनगर | Ahmednagar Crime: महिलेच्या घरात घुसून शिवीगाळ व मारहाण करत विनयभंग केल्याची घटना मंगलगेट परिसरात शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी तरूणाविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात विनयभंग, मारहाण, शिवीगाळ आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पीडित महिलेले फिर्याद दाखल केली असून सोनु ठोंबे (रा. मंगलगेट, अहमदनगर) या तरुणवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी या एका खासगी बँकेत नोकरी करतात. शनिवारी रात्री त्या घरी असताना त्यांच्या घरासमोर सोनु ठोंबे व मोन्या ठोंबे या दोघा भावाचे आपआपसात किरकोळ स्वरूपाचे वाद होत होते.. तेव्हा फिर्यादी यांचा मुलगा त्यांना म्हणाला, तुम्ही रस्त्यावर भांडण करू नका. याचा राग सोनु ठोंबे याला आल्याने त्याने फिर्यादी यांच्या घरामध्ये प्रवेश करत फिर्यादी यांचा गळा दाबून त्यांच्याशी गैरवर्तन केले. हातातील फायटरने उजव्या डोळ्याजवळ मारून जखमी केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे यांनी घटनास्थळी भेट दिली.
Web Title: Ahmednagar Woman beaten and molested by a fighter