Home Accident News Accident: अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक: बाप लेकांचा मृत्यू

Accident: अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक: बाप लेकांचा मृत्यू

Ahmednagar Unidentified vehicle hits two-wheeler Baap Leka dies

अहमदनगर | Accident: अहमदनगर-पुणे महामार्गावर केडगाव शिवारात आज पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत ऊसतोड मजुरीचे काम करणाऱ्या बाप-लेकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

या अपघातात (Accident) रावसाहेब हेरू वडते (वय ५७) व गणेश रावसाहेब वडते (वय ३०, दाेघे रा. बाेळेगाव, नागलवाडी, ता. शेवगाव) असे मयत (Death) बाप-लेकांची नावे आहेत.

वडते बाप-लेक ऊसतोड मजुरीचे काम करत होते. ते अहमदनगर शहरातील बोरुडे मळ्यात ऊस तोडणीचे काम करत होते. आज पहाटे ते कामानिमित्त पुण्याला जाण्यासाठी निघाले होते.  अहमदनगर-पुणे महामार्गावर केडगाव शिवारात आज पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास हा अपघात (Accident) झाला.

.दुचाकीवरून प्रवास करत असताना केडगाव शिवारातील हॉटेल वंदन समोर पहाटे साडेचारच्या सुमारास त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत बाप लेकाचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.  याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल (Crime Filed) करण्यात आला आहे.

Web Title: Ahmednagar Unidentified vehicle hits two-wheeler Baap Leka dies

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here