Home अहमदनगर फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत विवाहित महिलेवर अत्याचार

फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत विवाहित महिलेवर अत्याचार

Ahmednagar Torture of a married woman threatening to make photos and videos viral

अहमदनगर | Ahmednagar Crime News: अहमदनगर शहरातील एका उपनगरात राहणार्‍या  विवाहित महिलेचे फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर  अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मनोज भालचंद्र जाधव (रा. रेणुकानगर, बोल्हेगाव) याच्याविरोधात  तोफखाना पोलीस ठाण्यात  अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पिडीत विवाहितेने फिर्याद दिली आहे.  फिर्यादी महिला व मनोज जाधव यांची मैत्री होती. यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. ऑक्टोबर 2021 मध्ये मनोज याच्यासोबत फिर्यादी महिला एमआयडीसी येथील साईबन येथे गेल्यानंतर फिर्यादी महिला पाणी पिल्याने तिला झोप आली. यानंतर मनोज याने तिच्यासोबत शारीरिक संबंध केले. ही घडलेली घटना कोणाला सांगितली तर नवर्‍याला ठार मारण्याची धमकी दिली. तसेच चांदबिबी महाल येथे गेल्यावरही नवर्‍याला ठार मारण्याची धमकी देत मनोज याने फिर्यादी महिलेसोबत शारिरीक संबंध केले. फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास तोफखाना पोलीस करत आहे.

Web Title: Ahmednagar Torture of a married woman threatening to make photos and videos viral

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here