Home अहमदनगर अहमदनगर: जीवे मारण्याची धमकी देत ट्रक पेटवला

अहमदनगर: जीवे मारण्याची धमकी देत ट्रक पेटवला

Ahmednagar News: लोखंडी गजाने मारहाण करत हायवा ट्रक पेटवून देण्याची घटना, मिरजगाव पोलिसांत गुन्हा दाखल.

Ahmednagar Threatened to kill the truck and set it on fire

कर्जत:  तालुक्यातील रुईगव्हाण शिवारात आढळगावकडे अशोक लेलँड हायवा ट्रक घेऊन जात असलेल्या मजुराला तू बाया माणसे पाहून लघवी करतो का, असे म्हणत लोखंडी गजाने मारहाण करत हायवा ट्रक पेटवून देण्याची घटना आज रविवारी दुपारी १२.१५ वाजेच्या सुमारास श्रीगोंदा -जामखेड रोडवर रुईगव्हाण शिवारात घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

घडलेल्या घटनेबाबत मिरजगाव पोलिस ठाण्यात गौतमकुमार उपेंद्र महातो (वय २३), धंदा मजुरी रा. सट्टा, ता. जि. खगडिया, बिहार याने फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी गौतमकुमार उपेंद्र महातो (वय २३), धंदा मजुरी रा. सट्टा, ता.जि. खगडिया, बिहार हा अशोक लेलँड एम.एच.२४ ए.यू.- ७७०४ हा हायवा ट्रक रुईगव्हाण येथून आढळगाव येथे घेऊन जात असताना रुईगव्हाण शिवारात रघुवंदन मंगल कार्यालयासमोर रोडवर आला असता, फिर्यादी गौतमकुमार हा लघवी करण्यासाठी गाडीतून खाली उतरला होता. त्यावेळी त्याला आरोपी परशुराम चंदर ठोकळे व प्रणव सतीश आल्हाट (रा. रुईगव्हाण, ता. कर्जत) या दोघांनी जवळ जाऊन तू बाया माणसे पाहून लघवी करतो का, असे म्हणून फिर्यादीस लोखंडी गजाने मारहाण केली तसेच साईनाथ जालिंदर ठोकळे सर्व रा. रुईगव्हाण, ता. कर्जत याने यातील फिर्यादी व साक्षीदार तेथून जाण्यासाठी गाडीत बसले असताना फिर्यादी व साक्षीदारांना जीवे मारण्याच्या उद्देशाने हायवा गाडीवर पेट्रोल टाकून गाडी पेटवून देत गाडीचे नुकसान केले. घटनास्थळी मिरजगावचे सपोनि दिवटे, सहाय्यक फौजदार दत्तात्रय कासार व कर्मचाऱ्यांनी भेट देवून पाहणी केली. याबाबत मिरजगाव पोलिस ठाण्यात गु.र.नं. व कलम २७७ / २०२३ भादवी कलम – ३०७, ४३५, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे हे करीत आहे.

Web Title: Ahmednagar Threatened to kill the truck and set it on fire

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here