दगडाने मारहाण करत व चाकूचा धाक दाखवून तरूणास लुटले
Ahmednagar News Live | अहमदनगर | Theft: नगर तालुक्यातील चाँदबीबी महालाच्या शेवटच्या वळणावर बारदरी शिवारात दगडाने मारहाण करत व चाकूचा धाक दाखवून तरूणाला लुटल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत आयुष मधुसूधन खंडेलवाल (वय 26 रा. समतानगर, सावेडी) हे जखमी झाले आहेत. त्यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यावरून दोन चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावेळी चोरट्यांनी खंडेलवाल यांच्याकडील 20 हजार रूपये किंमतीचा लॅपटॉप, रोख एक हजार रूपये, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, आधारकार्ड, डेबीट कार्ड, मतदान कार्ड लंपास करत पसार झाले आहे. रात्रीच्यावेळी खंडेलवाल हे त्यांच्या कारमधून बारदरी शिवारातून जात असताना ते चाँदबीबी महालाच्या शेवटच्या वळणावर थांबले. त्यावेळी तेथे दुचाकीवरून आलेल्या दोघांनी खंडेलवाल यांच्या डोळ्यावर दगडाने मारून जखमी केले. चाकूचा धाक दाखवून खंडेलवाल यांच्याकडील लॅपटॉप, रक्कम व कागदपत्र घेवुन पोबारा केला.
घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, एलसीबीचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक राजेंद्र सानप यांनी भेट दिली असून अधिक तपास तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहे.
Web Title: Ahmednagar Theft young man was robbed in fear of a knife