Corona: राज्यात कोरोनाची धडकी भरवणारी रुग्णसंख्या
मुंबई | Maharashtra Corona Update: राज्यात कोरोनाच्या रुग्णसंखेत लक्षणीय वाढ होत आहे. बुधवारी राज्यात 26 हजार 538 कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. बुधवारच्या तुलनेत राज्यात आज 9 हजारांपेक्षा अधिक रुग्णांची वाढ झाली आहे. राज्यात आज गुरुवारी एकूण 36 हजार 265 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. ओमायक्रॉनचे 79 रुग्ण आढळून आले आहेत. आज दिवसभरात कोरोनामुळे 13 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
मुंबईत गेल्या 24 तासात 20 हजार 181 कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे तर धारावीत 107 कोरोना रुग्णांचं निदान झालं आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
राज्यात ओमायक्रॉनचे दिवसभरात 79 रुग्ण आढळले आहेत. सर्वाधिक ओमायक्रॉन रुग्ण हे मुंबईत सापडले आहेत. राज्यातील 79 पैकी 57 रुग्ण हे एकट्या मुंबईतील आहेत. राज्यात एकूण ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा हा 876 वर पोहोचला आहे.
Web Title: Maharashtra Corona Update Today 36265