Home अहमदनगर अहमदनगर: तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर: तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

Ahmednagar News:  ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन तरुणीने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.

Ahmednagar Nevasa Suicide of a young woman by hanging.jpeg

नेवासा | Nevasa : ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली. नेवासा शहरातील शेजूळ गल्ली येथे  ही घटना घडली. ही घटना शुक्रवारी (दि.३१) दुपारी समोर आली.

हर्षदा संतोष नारळे (वय १६) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत नेवासा येथील कर सल्लागार सागर अरुण देशपांडे (रा. नेवासा खुर्द) यांनी पोलिसात खबर दिली. हर्षदा हिचे वडील संतोष नारळे हे देशपांडे यांच्याकडे मदतनीस म्हणून काम करतात. संतोष नारळे शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे कामावर गेले. दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांना हर्षदा हिने गळफास घेतला असल्याची माहिती फोनद्वारे मिळाली. हर्षदा हिने घराच्या मागील बाजूस टॉयलेटमध्ये स्कार्फच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले तिला तत्काळ खासगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच हर्षदा मयत झाली होती.

Web Title: Ahmednagar Suicide of a young woman by hanging

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here