Home अहमदनगर बायोडिझेल तस्करीचा मास्टरमाइंड शिवसेनेचा शहरप्रमुख

बायोडिझेल तस्करीचा मास्टरमाइंड शिवसेनेचा शहरप्रमुख

Ahmednagar Shiv Sena mayor, mastermind of biodiesel smuggling

अहमदनगर | Ahmednagar: बायोडिझेल तस्करीत शिवसेनेचा शहर प्रमुख तथा माजी नगरसेवक दिलीप सातपुते याचे नाव समोर आले आहे. हाच या तस्करीचा मास्टरमाइंड असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले असून पुरावे हाती आले आहेत. या गुन्ह्यामध्ये सातपुते याचा समावेश आरोपी म्हणून करण्यात आला आहे. पोलीस तपासाची कुणकुण लागताच सातपुते नगर शहरातून फरार झाला असून पोलिसांनी शोध सुरु केला आहे. या गुन्ह्यात सहभागी असलेल्यांचे चांगलेच धाबे दणाणले असून त्यांनीही शहर सोडल्याची चर्चा आहे.

२२ ऑक्टोबर रोजी पुरवठा विभाग व कोतवाली पोलिसांनी केडगाव बायपास चौकात छापा टाकून बायोडिझेलवर कारवाई करण्यात आली होती. यामध्ये ५२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत पोलिसांनी १० जणांना अटक केली होती. या गुन्ह्यात राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप असल्याची नगर शहरात चर्चा होती. या गुन्ह्याचा तपास पोलिसांनी गांभीर्याने घेत सातपुतेसह आणखी कोणाचे नावे समोर येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या तस्करीत मोठमोठ्या लोकांचा हात असल्याची चर्चा आहे.

महत्वाचे: संगमनेर अकोले न्यूज नवीन सुपर फास्ट स्वरूपात आजच आपला  अॅप येथून अपडेट करा.   संगमनेर अकोले न्यूज 

Web Title: Ahmednagar Shiv Sena mayor, mastermind of biodiesel smuggling

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here