Home अहमदनगर चंदन चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

चंदन चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Ahmednagar Sandalwood gang exposed

अहमदनगर | Ahmednagar: कोपरगाव तालुक्यातून चंदनाची झाडे चोरून नेणाऱ्या राहात्याच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. या टोळीला नेवासा फाटा येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.

त्यांच्याकडून चंदनाची लाकडे व हृन्दायची कार असा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कोपरगाव तालुक्यातील कोल्हे वस्ती येथील घनश्याम पोपट नेटके यांनी फिर्याद दिली होती. कोपरगाव नगर येथील बालिकाश्रम रोडसह अन्य ठिकाणाहून चंदनाची झाडे चोरी करून नेण्यात येत होती. ही चोरी राहता येथील एका टोळीने केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या पथकाने सापळा रचून नेवासा फाटा येथे सिताराम भानुदास कुऱ्हाडे, करण विजय कुऱ्हाडे रा. चितळी स्टेशन राहता, परमेश्व भोसले, सतीश शिंदे संतोष मारुती शिंदे, गणेश विष्णू गायकवाड रा. गंगापूर जि. औरंगाबाद या सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.   

Web Title: Ahmednagar Sandalwood gang exposed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here