करोनाबाधित मयताच्या अंगावरील दागिने जिल्हा रुग्णालयातून गायब
अहमदनगर Ahmednagar: भिंगार परिसरातील एका करोनाबाधित उपचार सुरु असताना मयत झालेल्या महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने गायब झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
भिंगार परिसरात राहणाऱ्या एका करोनाबाधित महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्यावर उपचार सुरु होते. १८ सप्टेंबर रोजी तिचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. सदर महिलेचा मृत्यू होण्याअगोदर करोना अहवाल निगेटिव्ह आल्याने मृतदेह नातेवाईक यांच्याकडे देण्यात आला. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर महिलेच्या अंगावरील दागिने नसल्याचे दिसून आले. याबाबत मयत महिलेच्या नातेवाईक यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी रुग्णालयात जाऊन प्राथमिक माहिती घेतली आहे.
संबंधित महिलेवर ज्या वार्डात उपचार सुरु होते. तेथील सीसीटीव्ही फुटेज देण्याची मागणी पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायवट यांनी केली आहे. जिल्हा रुग्णालयातील फुटेज मिळाल्यानंतर महिलेच्या दागिनेबाबत माहिती मिळेल असे सांगितले. सीसीटीव्ही फुटेजची होणार तपासणी असे पोलीस उपनिरीक्षक यांनी सांगितले.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, and Latest Marathi News
Web Title: Ahmednagar ornaments on the body of the coronated Mayatadisappeared