अहमदनगर: तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
अहमदनगर | Ahmednagar News: गणेश उत्सव काळात जिल्ह्यातील तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये श्रीरामपूर विभागाच्या अपर पोलीस अधीक्षक दिपाली काळे, नगर शहराचे उपविभागीय अधिकारी विशाल धुमे, आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपाधीक्षक प्रांजल सोनवणे या तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.
अपर पोलीस अधीक्षक दिपाली काळे यांच्या जागी आंबेजोगाई येथील स्वाती भोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपाधीक्षक प्रांजली सोनवणे यांची सोलापूर येथे सहायक पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर नगर शहर विभागाचे पोलीस उपाधीक्षक विशाल धुमे यांची औरंगाबाद येथे सहायक पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Web Title: Ahmednagar News Transfers of three senior police officers