Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात इतके टक्के लोकांनी लसीकरणाकडे पाठ फिरविली

अहमदनगर जिल्ह्यात इतके टक्के लोकांनी लसीकरणाकडे पाठ फिरविली

Ahmednagar News Today Vaccination

अहमदनगर | Ahmednagar News Today Vaccination:  काही महिन्यांपूर्वी लसीकरण केंद्रांवर रांगा लागल्या होत्या, तेव्हा करोना प्रतिबंधक लस शिल्लक नव्हती. मात्र दोन महिन्यांपासून नागरिक करोनाबद्दल एवढे निर्धास्त झाले की लसीकरणकडे पाठ फिरविली आहे.  जिल्ह्यात अद्याप 22 टक्के पात्र नागरिकांनी पहिली लसच घेतलेली नाही. दुसरी लस न घेणार्‍यांची संख्याही 56 टक्के आहे.

जिल्ह्यात ओमिक्रॉनमुळे संकट घोंगावत आहे. करोना काळात सर्वांनाच मोठा त्रास सहन करावा लागला. सध्या लस असूनही लस घेण्याकडे दुर्लक्ष करणार्‍यांना ‘तुमचा विचार काय?’ असे विचारण्याची वेळ आली आहे. प्रशासनाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात 36 लाख 3 हजार 600 जण लसीसाठी पात्र आहेत. त्यापैकी कालअखेर 28 लाख 17 हजार 981 जणांनी लस घेतली आहे. यापैकी 15 लाख 96 हजार 131 जणांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे.

जिल्ह्यातील ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण शुक्रवारी श्रीरामपूरमध्ये आढळून आल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले. कालच सायंकाळी निर्बंधांची नवी नियमावलीही जाहीर झाली. त्यात नो लस, नो एन्ट्री या नियमामुळे लस न घेतलेल्या अनेकांनी सकाळपासून लस केंद्रांकडे धाव घेतली होती. मात्र नियमांकडे दुर्लक्ष करण्याच्या नागरिकांची सवय मोडून त्यांना नियमांच्या चौकटीत बसविण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे.

Web Title: Ahmednagar News Today Vaccination

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here