नदीत विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू
कोपरगाव | Ahmednagar News: लग्नात कबूल केलेले ५० रुपयांची रक्कम दिली नाही, लग्न चांगले केले नाही यावरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला गेला. त्याच विवाहितेचा मृतदेह संशयास्पद धारणगाव येथील गोदावरी नदीत पुलाजवळ गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास आढळून आला.
राणी किरण चंदनशिव वय १९ रा. धारणगाव ता. कोपरगाव असे या मयत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी दत्तात्रय तुकाराम साठे वय ४५ मढी बुद्रुक कोपरगाव यांनी हुंड्यासाठी घातपाताचा संशय व्यक्त करत कोपरगाव पोलीस ठाण्यात किरण सदाशिव चंदनशिव, साहेबराव जगन्नाथ चंदनशिव, मंदा साहेबराव चंदनशिव, लक्षमण साहेबराव चंदनशिव सर्व रा. धारणशिव कोपरगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कोपरगाव पोलिसांनी या चारही आरोपींना कोपरगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १२ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.
Web Title: Ahmednagar News Suspicious death of a married woman in the river