नगर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोडणार: हसन मुश्रीफ
संगमनेर | Ahmednagar News: राष्ट्रवादी कॉग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीत आता ज्या निवडणुका आहेत. त्या निवडणुकांचा आढावा घेण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, कृषी उत्पन्न बाजार समिती, कोल्हापूर महानगरपालिका, ९ नगरपालीकांसह इतर निवडणुका आहे. अहमदनगर जिल्ह्यातही काही निवडणुका आहेत. त्यामुळे दोन जिल्ह्याचे काम एक माणूस कसा करू शकेल असा प्रश्न उपस्थित करत हसन मुश्रीफ यांनी नगरचे पालकमंत्री सोडण्याचा पुनरुच्चार केला आहे.
पालकमंत्री हे शुक्रवारी संगमनेर व अकोले तालुक्यात आले होते. अकोलेतही त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत या गोष्टीचा उल्लेख केला तसेच राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी पुन्हा पुनरुच्चार केला. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व पोलीस अधीक्षक मनोज पाटील, उप विभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Web Title: Ahmednagar News Hasan Mushrif to step down as Nagar Guardian Minister