अहमदनगर कोरोना ब्रेकिंग: जिल्ह्यात एक हजारापेक्षा अधिक रुग्ण
अहमदनगर | Ahmednagar News Corona Update 1026: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत चांगलीच रुग्णसंख्या वाढली आहे. गेल्या २४ तासांत तब्बल १०२६ रुग्ण वाढले आहे. रुग्णसंख्या वाढल्याने पारनेर तालुक्यात चिंता व्यक्त होत आहे.
पारनेर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. दोनशेपेक्षा अधिक रुग्ण एकाच तालुक्यात मिळून आले आहे तर त्याखालोखाल जामखेड तालुक्यात रुग्ण वाढले आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:
नगर शहर: २३
नगर तालुका: ६६
श्रीगोंदा: १७
शेवगाव: ९७
संगमनेर: ७०
राहता: २६
कोपरगाव: १९
नेवासा: ५९
पारनेर: २१०
कर्जत: ७४
जामखेड: १८०
राहुरी: ४३
पाथर्डी: ५९
श्रीरामपूर: १९
अकोले: ५२
इतर जिल्हे: १२
असे एकूण १०२६ रुग्णांची नोंद झाली आहे.
Web Title: Ahmednagar News Corona Update 1026