धक्कादायक: बेपत्ता अल्पवयीन मुलीचा मृतदेह तरुणाच्या घरात आढळला
श्रीरामपूर | Ahmednagar News: एका १३ वर्षीय अल्पवयीन आदिवासी मुलीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत राहता तालुक्यातील चितळी येथे एका तरुणाच्या घरात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही मुलगी दोन दिवसांपासून बेपत्ता होती. या मुलीच्या घरापासून काही अंतरावरच दुसऱ्या एका तरुणाच्या घरात मृतदेह मिळून आला. त्यामुळे हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
आकाश खरात हा तरुण आजीसोबत चितळी येथील त्याच्या घरात राहत होता, त्याचे कुटुंबीय औरंगाबाद येथे राहत आहे. आजी ही काही दिवसांपूर्वी औरंगाबाद येथे गेली होती. हा तरुण एकटाच घरात राहत होता. हा मृतदेह जेव्हा घरात आढळून आला तेव्हा तो तरुण तेथे आढळून आला नाही. गावातील ग्रामस्थांनी पोलिसांना कळविले.
मुलीचे कुटुंबीय व नातेवाईक यांनी आरोपीच्या अटकेची मागणी केली आहे. गुरुवारी सायंकाळी चितळी येथील आकाश राधु खरात या तरुणाच्या घरात एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत असल्याची माहिती श्रीरामपूर पोलिसांना मिळाली. पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह खाली उतरवण्यात आला. श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयात मृतदेह शवविचेदन करण्यासाठी नेण्यात आला. शवविचेदन अहवालानंतरच ठोस माहिती देता येईल त्यानंतरच गुन्ह्याची दिशा निश्चित केली जाईल अशी माहिती पोलीस निरीक्षक साळवे यांनी दिली. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Web Title: Ahmednagar News body of a missing minor girl was found in the youth’s house