अहमदनगर ब्रेकिंग: सेवानिवृत्त प्राध्यापकाचा खून
Ahmednagar News: सेवानिवृत्त प्राध्यापक यांचा खून केल्याच्या आरोपावरून तब्बल वर्षानंतर 9 जणांविरुध्द खुनाचा (Murder) गुन्हा.
कोपरगाव: शहरातील शारदानगर येथील सेवानिवृत्त प्राध्यापक भीमराव लक्ष्मण काळे यांचा खून केल्याच्या आरोपावरून तब्बल वर्षानंतर 9 जणांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी उषा काळे व त्यांचे पती भीमराव काळे हे संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेत प्राध्यापक होते. गत वर्षी मे महिन्यात ते सेवानिवृत्त झाले. 8 मे 2022 रोजी दुपारी आरोपी सुभाष वैद्य, सरला वैद्य, किरण वैद्य, दीपाली वैद्य, एकनाथ चव्हाण, संदीप चव्हाण, गंगुबाई चव्हाण, पाटील, सोनवणे आदी नऊ जणांनी दिवा फिरवून लावण्याच्या किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला होता. त्याचे हाणामारीत रुपांतर झाले होते.
त्याबाबत कोपरगाव शहर पोलिसांत त्याच दिवशी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यात आरोपींनी पतीस लाथाबुक्क्यांनी मारहाण करून मारले असल्याचा आरोप फिर्यादी महिलेने केला. त्यात पतीचे निधन झाले, असा आरोप आहे. त्यावरून त्यांनी कोपरगाव येथील अतिरिक्त न्यायदंडाधिकारी महेश शेलार यांच्याकडे न्याय मागीतला होता.
न्यायालयाने या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. त्या आदेशानुसार कोपरगाव शहर पोलिसांनी गुन्हा क्रं.123/2023 भा.द.वि. कलम 302, 395, 504, 506, 509, 120 (ब) 34 प्रमाणे आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे करीत आहेत.
Web Title: Ahmednagar Murder of Retired Professor
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App