हॉटेल व्यावसायिकाचा विहिरीत आढळला मृतदेह
Ahmednagar Suicide News: हॉटेल व्यावसायिकाने विहिरीत आत्महत्या केल्याची घटना, आत्महत्या का केली याबाबत अद्याप कारण समोर आले नाही.
अहमदनगर: सावेडी उपनगरातील एका हॉटेल व्यावसायिकाने विहिरीत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अनिल तुकाराम ढवण वय ४२ रा. तपोवन रोड सावेडी असे मृत हॉटेल व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अनिल ढवण यांचे तपोवन रोडवर हॉटेल आहे. ते रविवारी रात्रीपासून बेपत्ता होते. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला परंतू ते कोठेही मिळून आले नाही.
सोमवारी सकाळी नातेवाईकांनी तोफखाना पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. सोमवारी दुपारी अनिल यांचा मृतदेह तपोवन रोड परिसरातील कादंबरी नगरी येथील विहीरीत असल्याची खबर मिळाली होती. त्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली असता रात्री उशिरा विहिरीमध्ये त्यांचा मृतदेह मिळून आला. त्यांचा चुलत भाऊ सतिश सखाराम ढवण यांनी मृतदेह (Dead Body) जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केला. तेथे मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.
दरम्यान अनिल ढवण यांनी आत्महत्या का केली याबाबत अद्याप कारण समोर आले नाही. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस अंमलदार बाळासाहेब गिरी हे करीत आहेत.
Web Title: Ahmednagar hotelier committing suicide in a well