Home अहमदनगर नातलगाने पुण्यात लग्नास जायचे सांगत चार तोळे सोने नेऊन केले लंपास  

नातलगाने पुण्यात लग्नास जायचे सांगत चार तोळे सोने नेऊन केले लंपास  

Ahmednagar Gold theft from Relatives

अहमदनगर | Theft: औरंगाबादच्या पाहुण्यांनी लग्नाला जायचे असे सांगत विश्वास संपादन करीत चार तोळे सोने व दोन नव्या साड्या नेल्या मात्र त्या वस्तू परत दिल्याच नाही. आता हा ऐवज मिळावा यासाठी महिलेने पोलिसांत धाव घेत तोफखाना पोलीस ठाण्यात औरंगाबाद नातलगांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.  

ललित कानिफनाथ लकडे व त्याची पत्नी साक्षी (रा. जालना रोड, औरंगाबाद) असे या गुन्हा दाखल झालेल्या दाम्पत्याची नावे आहेत. ही घटना १५ फेब्रुवारी २०२० रोजी घडली. मंगळवारी वैशाली प्रशांत धोत्रे रा. तोफखाना यांनी पोलिसांत फिर्याद दिल्याने तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत माहिती अशी की, लकडे व धोत्रे हे नातलग आहेत, लकडे हे नगरमध्ये आल्यानंतर धोत्रे यांच्या घरी चहा पाणी घेतला. चुलत भावाचे पुण्यात लग्न आहे. तिकडे जायचे आहे. साडी सोने औरंगाबादच्या घरी राहिले आहे. लग्नात वापरण्यासाठी सोने द्या अशी मागणी लकडे यांनी धोत्रे यांच्याकडे केली. मोठ्या विश्वासाने धोत्रे यांनी लकडे यांना साडे तीन तोळ्याचे मंगळसूत्र, अर्धा तोळ्याची ठुशी आणि दोन नव्या साड्या दिल्या. लकडे यांनी नेलेला ऐवज परत करतील या आशेवर धोत्रे होत्या. मात्र तो ऐवज पुन्हा परत केलाच नाही. वेळ काढून नेत असल्याचे दिसून येत असल्याने धोत्रे यांनी पोलिसांत धाव घेतली.  

Web Title: Ahmednagar Gold theft from Relatives

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here